India-Israel | भारत इस्रायलकडून 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार, मोदी सरकारचा-2 चा पहिला करार | ABP Majha
Continues below advertisement
दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारनं पहिलाच करार हा संरक्षण क्षेत्रासाठी केला आहे. भारताने इस्रायलशी ३०० कोटी रुपये किंमतीच्या स्पाइस बॉम्ब खरेदीचा करार केला आहे. बालाकोटमध्ये हवाई हल्ल्यात भारतीय वायुदलानं हेच बॉम्ब वापरले होते. हा बॉम्ब एका विशिष्ट जीपीएस गायडन्स किटसोबत लावला जातो. एकूण 300 स्पाईस बॉम्बची खरेदी भारताकडून केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात हे अद्ययावत स्पाइस बॉम्ब दाखल होणार आहेत.
Continues below advertisement