#IndvsSL : भारताकडे टी-20 मालिका जिंकण्याची संधी
Continues below advertisement
पहिल्या ट्वेण्टी 20 सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज होणाऱ्या दुसऱ्या लढतीसाठी सज्ज झाली आहे. हा सामना इंदूरच्या होळकर मैदानावर खेळवण्यात येईल. कटकमधील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात 93 धावांनी मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे टीम इंडियाच्या शिलेदारांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असेल.
Continues below advertisement