न्यूयॉर्क : भारताचे दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश

Continues below advertisement

युक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारताचे दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश बनले आहेत. ब्रिटनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांच्यासोबतच्या अटीतटीच्या लढतीत त्यांनी हा विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये भारताच्या दलवीर भंडारींना सलग दुसऱ्यांदा न्यायाधीश होण्याचा मान मिळाला आहे. ब्रिटनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांच्यासोबतच्या लढतीत मोठ्या फरकानं निवडणूक जिंकत न्यायाधीशपदी विराजमान झाले आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यात ब्रिटननं आपलं नामांकन मागे घेतलं आणि भारताचे दलवीर भंडारी न्यायाधीशपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्त झाले.

दलवीर भंडारींनी सुरुवातीच्या 11 राऊंड्समध्ये मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे ब्रिटननं आपलं नामांकन मागे घेतलं. दलवीर भंडारींना या निवडणुकीत 183 मतं  मिळाली आहेत, यात सुरक्षा परिषदेच्या 15 मतांचाही समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram