Team India Relaxation | सेमी फायनलआधी टीम इंडियाला 3 दिवसांचा रिलॅक्सेशन ब्रेक | ABP Majha
बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया 3 दिवसांच्या ब्रेकमध्ये फिरायला गेली आहे. इंग्लंडमधील लीड्स शहरपासून काही अंतरावर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये टीम इंडियातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ वेळ घालवत आहेत. तिथे ते गोल्फ कोर्स, ट्रँक्विलिटी, निसर्गाचा आनंद लुटत आहेत. टीम इंडिया त्या रेसॉर्टमध्ये दाखल होतानाची एक्स्क्लुझिव्ह दृश्यं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. विराट आणि त्याची सेना मागील 42 दिवसांपासून एका मागून एक विश्वचषकातील साखळी सामन्यांमध्ये व्यस्त होती.