नवी दिल्ली : हेडस्कार्फ घालण्याला विरोध, सौम्या स्वामीनाथन एशियन चेस चॅम्पियनशीपमधून बाहेर

Continues below advertisement
इराणमधील एशियन टीम चेस चॅम्पियनशीप स्पर्धेतून भारतीय बुद्धिबळपटू सौम्या स्वामिनाथननं माघार घेतली आहे. इस्लामिक देश असणाऱ्या इराणमधील हमदान येथे एशियन टीम चेस चॅम्पियनशीप ही स्पर्धा होणार आहे. इराणमध्ये हेडस्कार्फ घालणं बंधनकारक आहे..आणि हाच नियम खेळाडूंवर लादला गेलाय..मात्र, हा नियम म्हणजे माझ्या विचार स्वातंत्यावर गदा आहे.. जबरदस्तीनं हेडस्कार्फ घालणं मान्य नाही, अशी पोस्ट सौम्यानं फेसबुकवर टाकली आहे.. सौम्या ही देशातल्या महिला बुद्धिबळपटूंमध्ये पाचव्या स्थानी तर जागतिक क्रमवारीत 97व्या स्थानी आहे...
याआधी 2016 साली, भारतीय नेमबाज हीना सिद्धूनंही याच कारणामुळे इराणमध्ये आयोजित एशियन एअरगन स्पर्धेतून माघार घेतली होती...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram