इंदापूर, पुणे : पत्नीचे डोहाळे महागात, कैऱ्या तोडल्याने पती-पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण
Continues below advertisement
इंदापुरात पत्नीचं डोहाळे पुरवणं पतीच्या चांगलंच अंगलट आलं. पत्नीसाठी कैऱ्या तोडल्याने पतीसह पत्नीवरही लाकूड आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये जाधव दाम्पत्य गंभीर जखमी झालं आहे.
विश्वास जाधव आणि त्यांची पत्नी फलटणहून भिगवणला एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी घरी परताना या जोडप्याला रस्त्याच्या कडेच्या झाडाला कैऱ्या लगडलेल्या दिसल्या.
विश्वास जाधव यांच्या पत्नीने त्यांच्याकडे कैऱ्यांची मागणी केली. पतीनं लागलीच झाडाच्या 2 कैऱ्या तोडल्या. मात्र कैऱ्या तोडल्याचं दिसताच शेताच्या मालकानं मुलासह घटनास्थळी धाव घेतली.