इंदापूर : दूध प्रश्नावर गडकरींच्या अध्यक्षतेखाली तोडगा काढू : पाशा पटेल

Continues below advertisement
ध उत्पादक शेतकऱ्याला प्रतिलीटर 5 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र आंदोलन छेडलंय. पंढरपुरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाला सुरुवात केली...आणि आज राज्यातील अनेक प्रमुख शहरांना होणारा दूध पुरवठा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला.. काही जिल्ह्यात दुधाचे टँकर रस्त्यावर सोडल्यानं लाखो लीटर दूध वाया गेलं... दरम्यान, मुंबईच्या दुधपुरवठ्यावर अद्याप याचा कोणताही परिणाम झाला नसल्य़ाचं पाहायला मिळत आहे. मात्र उद्यापासून दुधाच्या तुटवड्याची शक्यता आहे..
सहकारी आणि खासगी दूध संघटनांनी दुधाला 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय मात्र प्रतिलीटर 5 रु. अनुदान मिळावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे...
आज राज्यात विविध ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर दूध अडवलं. काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलं. तर कुठे आंदोलनात सहभागी होत दूध उत्पादकांनी दुधाचा सुयोग्य वापर केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram