इंदापूर : शेतकरी कर्जमाफी योजना सन्मानित नसून अपमानित योजना, अजित पवारांची टीका
शेतकरी कर्जमाफी योजना सन्मानित योजना नाही तर अपमानित योजना आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. काल इंदापूर तालुक्यातील कळस गावात डेअरी उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेनेचे अनेक नेतेही उपस्थित होते. त्यांनाही पवारांनी कोपरखळ्या मारल्या.