इंदापूर : पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार विटी-दांडू खेळण्यात दंग
Continues below advertisement
राजकीय मैदानात तुफान फटकेबाजी करणाऱ्या अजित पवार हे वैयक्तिक जीवनातही हसत-खेळत वावरणारे व्यक्तिमत्त्व आहेत. लोकांमध्ये मिसळून जाणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. याचीच प्रचिती बारामतीत आली. निमित्त ठरलं पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचं.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बारामती येथे ‘एनव्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने ‘मातीतल्या खेळांची जत्रा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटी-दांडू खेळण्याचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केले होते.
राजकारणात शाब्दिक फटकेबाजी करताना नेमका नेम धरणाऱ्या अजित पवारांचा विटी-दांडू खेळताना मात्र सहावेळा नेम चुकला. मात्र त्यांनी विटी-दांडू खेळाचा मनमुराद आनंद लुटला आणि उपस्थितांची दाद मिळवली.
आगामी तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विटीदांडू, गोट्या, लगोरी, टायर पळविणे, भोवरा अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आलं आहे.