FYJC Admission | आयसीएसई विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाच विषयांचेच गुण ग्राह्य धरले जाणार | ABP Majha
शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाबाबत तीन जून रोजी काढलेल्या परिपत्रकात सुधारणा केली आहे. आता ज्या आयसीएसई विद्यार्थ्यांना राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, अशा आयसीएसई विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ग्राह्य धरताना पहिल्या पाच विषयाचे गुण ग्राह्य जाणार आहेत. आयसीएसई विद्यार्थ्यांच्या आयसीएसईच्या मार्कशीटवर जे सरासरी गुण देण्यात आले आहेत, त्या सहा विषयांपैकी पहिल्या पाच विषयाचे सरासरी गुण अकरावी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील, असे आदेश शिक्षण उपसंचालकाना देण्यात आले आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.