मुंबई : आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुंबई, पुण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी
आयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. बारावीत मुंबईचा अभिज्ञान चक्रवर्ती आणि तानसा शाह देशात पहिला आले, तर दहावीच्या परीक्षेत नवी मुंबईच्या स्वयम दासने बाजी मारली.
आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुंबई-नवी मुंबई आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. बारावीमध्ये मुंबईतील लीलावतीबाई पोदार हायस्कूलचा विद्यार्थी अभिज्ञान चक्रवर्ती आणि मुंबईच्याच कॅथेड्रल अँड जॉन कॅनन शाळेची विद्यार्थिनी तानसा शाह देशात पहिले आले.
पोदार हायस्कूलच्या प्रिया खजांची आणि रक्षिता देशमुख आणि पुण्याच्या बिशप्स स्कूलची रितीशा गुप्ता देशात दुसऱ्या आल्या.
दहावीत नवी मुंबईतील कोपरखैरणेच्या सेंट मेरी स्कूलमधील स्वयम दास 99.4 टक्के गुण मिळवून देशात पहिला आला. नरसी मोनजी स्कूलची अनोखी मेहता देशात दुसऱ्या क्रमांकावर आली.