मुंबई : ICICI बँकेच्या अडचणीत वाढ, 3 परदेशी कंपन्यांनी पडलेल्या दरात समभाग विकले
Continues below advertisement
देशातली सर्वात मोठी दुसरी खासगी बँक असलेली आयसीआयसीआय बँक दिवसेंदिवस खोलात जातेय. व्हिडीओकॉन समुहाला दिलेल्या कर्जावरुन बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना व्यवस्थापकीय मंडळानं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. मात्र त्यांच्या याच कारनाम्यांमुळे ३ बडे परदेशी गुंतवणूकदार कंपन्यांनी बँकेतील आपले समभाग काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आयसीआयसीआय बँकेपुढेच्या डोकेदुखी अजून वाढणार आहेत. तिन्ही कंपन्यांच्या समभाग फार मोठा नसला तरी गुंतवणूक आणि प्रतिमेच्या दृष्टीनं आयसीआयसीआय बँकेसाठी हा मोठा फटका आहे. दरम्यान, व्हीडिओकॉन समुहाला अधिकारांचा गैरवापर करुन कर्ज दिल्याप्रकरणी चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलंय.
Continues below advertisement