Modi Kulfi | सुरतमध्ये मोदींच्या चेहऱ्याची कुल्फी, आस्वाद घेण्यासाठी मोदी समर्थकांची गर्दी | गुजरात | ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर देशात आता मोदी लाट नव्हेतर मोदींची त्सुनामी असल्याचं चित्र दिसत आहे. गुजरातमधील सूरतमध्ये विवेक अजमेरा या मोदी समर्थकाने तर एका कुल्फीलाच मोदींचं नाव दिलं. अजमेरा यांचं आईस्क्रीम पार्लर आहे. तिथे सीताफळापासून बनणाऱ्या कुल्फीला मोदींचं नाव दिल्यानं ही कुल्फी तुफान गाजत आहे. मोदी समर्थक तर आवर्जून या कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
Continues below advertisement