Brahmos | भारतीय हवाई दलाची दोन ब्रम्होस क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी | ABP Majha
Continues below advertisement
जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची भारतीय हवाई दलाकडून यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राने तीनशे किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. रुटीन ऑपरेशनल ट्रेनिंगचा भाग म्हणून या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरल्याची माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आलीय. ब्रह्मोस हे मध्यम श्रेणीतील सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असून पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरूनही हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढलीय.
Continues below advertisement