मी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे : प्रकाश राज
मी हिंदूविरोधी नाही, फक्त मोदीविरोधी आहे, असे दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हिंदूविरोधी असल्याचे आरोप होत होते. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी इंडिया टुडेच्या साऊथ कॉन्क्लेव्हमध्ये या आरोपांना उत्तर दिले.