हैदराबाद : 36 वर्षीय न्यूज अँकरची आत्महत्या
हैदराबादमध्ये एका न्यूज अँकरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 36 वर्षीय राधिका रेड्डीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. 'माझा मेंदू हा माझा शत्रू आहे' अशा आशयाची सुसाईड नोट पोलिसांना राधिकाच्या बॅगेत सापडली. पोलिसांनी केस दाखल केली असून तपास सुरु आहे. राधिका 'व्ही6' या तेलुगू वृत्तवाहिनीची निवेदिका होती.