हैदराबाद : असीमानंदांची निर्दोष मुक्तता करणाऱ्या न्यायाधीशांचा राजीनामा

Continues below advertisement
हैदराबादमधील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांची निर्दोष मुक्तता करणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आहे. सुनावणीनंतर रेड्डींनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली.

हैदराबादच्या एनआयएच्या विशेष कोर्टात असीमानंद यांची आज सकाळी सुनावणी होती. तब्बल 11 वर्षांनंतर असीमानंद यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. निकाल सुनावल्यानंतर रेड्डी यांनी तातडीने राजीनामा दिला.

18 मे 2007 रोजी हैदराबादमधल्या मक्का मशिदमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 58 जण जखमी झाले होते. स्थानिक पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर 2011 मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला. एनआयएला पुरावे गोळा करण्यात अपयश आल्याचं कारण देत असीमानंद यांची सुटका करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram