हैदराबाद : नरेंद्र मोदींच्या उपोषणावर ओवेसींचं टीकास्त्र

Continues below advertisement
काँग्रेसच्या इन्स्टंट उपोषणाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषण करुन प्रतिउत्तर देणार आहेत...
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवलं याचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या म्हणजे 12 एप्रिलला मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपोषण करणार आहेत. मोदी दिल्लीमध्ये तर अमित शहा कर्नाटकातील हुबळीत उपोषण करतील.
भाजपाला 21 राज्यात सरकारनं सत्ता दिली असल्यामुळे काँग्रेस भाजपशी शत्रुत्वानं वागत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी केला आहे. संसदेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ठेवलेल्या चहापानालाही काँग्रेसने उपस्थिती लावली नाही आणि हा बहिष्कार टाकताना संसदेमधला गोंधळ नीट हाताळला गेला नसल्याची भावना व्यक्त केली.
मोदींच्या उपोषणावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनी टीकास्त्र सोडलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram