हैदराबाद : स्वामी असिमानंद सुटले, मक्का मशिद प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
Continues below advertisement
हैद्राबादमधल्या मक्का मशिद बाँम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुरावे सादर करण्यात एनआयएला अपयश आल्यामुळे स्वामी असिमानंद यांच्यासह पाच जण निर्दोष मुक्त झाले आहेत. असीमानंद आणि भारत मोहनलाल रत्नेश्वर हे दोघे सध्या जामिनावर आहेत. तर तिघे हैदराबादेतील तुरुंगात आहेत. 18 मे 2007 साली हैदराबादमधल्या मक्का मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर 58 जण जखमी झाले होते.
Continues below advertisement