'पतंजली'च्या आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!
बाबा रामदेव यांच्या 'पतंजली आयुर्वेद'चे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली आहे. हरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत बालकृष्ण यांनी आठव्या स्थानावर झेप घेतली असून त्यांची संपत्ती 70 हजार कोटी रुपये असल्याची माहिती आहे.