एल सेल्वाडोरमध्ये समुद्रातील 400 कासवं दगावली

Continues below advertisement
गुरूवारी एल सेल्वाडोर देशामध्ये तब्बल ४०० कासवं मृतावस्थेत तरंगताना दिसून आली आहेत. जिकीलिस्कोच्या महापौरांनी सांगितलेल्या माहितीनुसार लोकांनी समुद्रात बॉम्ब फेकल्यानं किंवा समुद्रातील पाण्यात भेसळ झाली असल्यानं एकाच वेळी 400 कासवांचा मृत्यू झाला.
किनाऱ्यापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर ही कासवं मृतावस्थेत पडली होती. तर काही कासवं पाण्यावर तरंगत असून मरण्याच्या अवस्थेत होती. या कासवांना जवळच्या प्राण्यांच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram