कर्नाटक : राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचे आकाशात हेलकावे, घातपाताचा संशय

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरशी घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी काल (शुक्रवार) दिल्लीहून हेलिकॉप्टरने हुबळी येथे गेले होते.

हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने ते हवेतच हेलकावे घेऊ लागलं. हेलिकॉप्टर लॅण्ड करताना वातावरणही स्वच्छ होतं. त्यामुळे हेलिकॉप्टर अचानक हेलकावे का घेऊ लागलं? असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola