व्हिटॅमिन डी शरीराला का आवश्यक आहेत व ते कसे मिळवाल? | आरोग्य | घे भरारी | एबीपी माझा
व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असणं गरजेचं असतं. पण सद्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो. इतकेच नाही तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होऊ लागतात. ज्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते ते व्यक्ती नेहमी आळस करताना दिसतात.