Election INK EXPLAINER | मतदानावेळी वापरल्या जाणाऱ्या शाईबाबत 'या' गोष्टी माहिती आहेत का? | ABP Majha
विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीत नेते, नेत्यांची भाषणं निवडणुकीचा निकाल काय असे अशा अनेक गोष्टी सध्या चर्चेत आहे. निवडणूक प्रक्रियेत अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्यामध्ये मतदाराच्या बोटाला लावली जाणारी शाई पण तितकीच महत्वाची आहे. ही शाई साधारण शाई नसल्याने तिच्याबद्दल अनेकांना कुतूहल असतं. त्यामुळे त्या शाईला काय म्हणतात, ही शाई कुठे आणि कशी बनते, पहिल्यांदा ही शाई निवडणुकीत कधी वापरली गेली, या शाईचा बोटावरचा डाग काही केल्या पुसत का नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या दोन मिनटात मिळणार आहेत.