तब्बल 38 दिवसांनतर हनीप्रीत लोकांसमोर आली, न्यायालयीन सल्ल्यानंतर कोर्टात आत्मसमर्पण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बाबा राम रहिम प्रकरणात बेपत्ता असलेली हनीप्रीत दिवसांनंतर लोकांसमोर आली. यावेळी हनीप्रितनं तिच्या आणि बाबा राम रहिम यांच्या नात्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण बाबा राम रहिम यांना पित्यासारखं मानतो, आणि हे सर्व मला बदनाम करण्यासाठी होतंय तसंच न्यायालयीन सल्ला घेतल्यानंतर आपण पंजाब हरियाणा हायकोर्टात हजर राहणार असल्याचंही हनीप्रितनं सांगितलं. बाबा राम रहीमला बलात्कारात दोषी ठरवल्यानंतर पोलीस हनीप्रीतच्या शोधात होते. तिच्या चौकशीतून बाबाचे अनेक कारनामे पुढे येण्याची शक्यता असल्यानं तिला अटक होणार हे कळताच हनीप्रीत पसार झाली होती.