VIDEO | ऐतिहासिक शनिवार वाड्याचा 276 वा वर्धापनदिन | पुणे | एबीपी माझा
पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्याचा आज 287वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने आज शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा सकाळी 9 ते 10 या वेळेत उघडण्यात आला होता. एरवी शनिवार वाड्याचा महाकाय दरवाजा बंद असतो. मुख्य दरवाजाच्या दिंडी दरवाजातून लोकांना आतमध्ये प्रवेश करावा लागतो. मात्र वर्धापनदिन असल्याने शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा आज खुला करण्यात आला. दरवाजासमोर सुंदर रांगोळीही काढण्यात आली होती. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी सन 1732मध्ये शनिवार वाडा बांधला होता.