स्पेशल रिपोर्ट : तब्बल 53 लाख शेतकरी पीकविम्यापासून वंचित?
पंतप्रधान पीक विम्याच्या ऑफलाईन अर्जाची मुदत संपून आता दीड महिना झाला. पीकं काढणीला आली. पण 53 लाख शेतकर्यांच्या अर्जांची ना छाननी झाली ना त्यांच्याकडून बँकांनी विम्यांचे पैसे भरून घेतले. यातून पळवाट म्हणून राज्य सरकारनं पीक विम्यांसाठी 31 जुलै पुर्वी ज्यांनी पीक पेरा घेतलाय अश्यांनाच लाभ देण्याचे आदेश काढला आहे.