नागपूर: चोरट्याची थेट न्यायालयातच चोरी

Continues below advertisement
जे न्यायालय गुन्हेगारांना शिक्षा सुनावतं, त्याच न्यायालयात गुन्ह्या करण्याचं अजब धाडस नागपूरातल्या एका चोरट्यानं दाखवलं आहे. हिंगणा तालुक्यातील चक्क दिवाणी आणि फौजदारी न्यायालयातच एका चोरट्यानं हात साफ केल्याची घटना घडली आहे. एक लॅपटॉप आणि काही हजारांचा ऐवज या चोरानं लंपास केला आहे. शिवाय शेजारीच असणारे महावितरणचे कार्यालय आणि गॅस एजन्सीचं कुलुपही चोरट्यानं तोडलं.  29 जूनच्या मध्यरात्रीची ही घटना आहे. चोरीची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram