Himachal Pradesh Bus Accident | कुल्लूत 500 फूट खोल दरीत बस कोसळून भीषण अपघात | हिमाचल प्रदेश | ABP Majha
हिमाचल प्रदेशमधील कुल्लूत बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून, या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला.. 37 जण जखमी झाले आहेत. कुल्लूमधील बंजार येथे हा अपघात झाला.
बस कुल्लू येथून गाडागुशैणीत जात होती. दरम्यान, बंजार येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भियोग मोठ जवळ ही बस 500 फूट खोल दरीत कोसळली. या बसमधून सुमारे 40 ते 50 जण प्रवास करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजल्यानंतर पोलिसांसोबत स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले.