Jalna Rain | जालन्यात आज पावसाचा पाचवा दिवस, आण्वा, पारध, जानेफळ भागात जोरदार पाऊस | ABP Majha
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात पाचव्या दिवशी देखील तुफान पाऊस झालाय. रायघोळ आणि जुई नदी ला मोठा पूर आला आहे. भोकरदन तालुक्यातल्या आण्वा,पारध, जानेफळ, भागात शेतातूंन पाणी वाहू वाहत आहे. पारध इथल्या शाळेत तळ्यांमध्ये पाणी साचावं तसं चित्र आहे. त्यामुळे जनता हायस्कुल मध्ये पाणी शिरल्याने शाळेला सुट्टी मिळाली आहे.