मुंबई : येत्या 48 तासात मुंबई-पुणे-नाशकात उष्णतेच्या लाटेचा अंदाज
Continues below advertisement
वाढत्या उकाड्यामुळे मुंबई-पुणे-नाशकातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यांचा हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. 'स्कायमेट'ने हा अंदाज वर्तवला आहे.
नाशिक-पुण्यात पारा चार ते सहा अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर मुंबई आणि परिसरात सहा ते आठ अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या इतर भागांतही उष्णता वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे उष्णतेच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी थेट सूर्यकिरणांपासून अंग झाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.