पुढच्या तीन दिवसात विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Continues below advertisement
विदर्भ, मराठवाड्यासाठी पुढचे 3 दिवस जास्त कडाक्याचे असणार आहेत, कारण इथं उष्णतेची लाट असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातल्या अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळमध्ये तर मराठवाड्याच्या बहुतांश भागात पुढचे 3 दिवस तापमानात लक्षणीय वाढ होईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, देशातल्या सर्वात उष्ण शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या अकोले, चंद्रपूर आणि मराठवाड्यातल्या परभणीचाही समावेश झाला आहे. इथे मागच्या 24 तासात तब्बल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं ही यादी जाहिर केली आहे. पुढचे 3 दिवस हा उकाडा असाच असणार आहे, त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Continues below advertisement