आदर्श प्रकरण : अशोक चव्हाणांना दिलासा, चौकशीचे आदेश हायकोर्टाकडून रद्द
Continues below advertisement
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आदर्श घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी दिलेले चव्हाणांच्या चौकशीचे आदेश बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने रद्द केले आहेत. त्यामुळे आता हा खटला सुरु असलेल्या सीबीआय कोर्टातही चव्हाणांना दिलासा मिळणार आहे.
Continues below advertisement