राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’बाहेरच फेरीवाले बसणार?

Continues below advertisement
फेरीवाल्यांवरुन राज्यभरात आंदोलन छेडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरच आता फेरीवाले बसणार आहेत. फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले असून  त्यापैकी एक हॉकर्स झोन हा राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि घराच्या मागच्या बाजूला असणार आहे.

एम. बी. राऊत आणि केळुसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी दहा अशा एकूण २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, सध्या या रस्त्यांवर एकही फेरीवाला बसत नाही. तसंच या परिसरात शाळा असल्यानं हॉकर्स झोन तयार करण्याचा नियमावलीचं उल्लंघन करण्यात आल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram