हरियाणा : कुत्र्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेल, क्रिटेररी हॉटेलचं एका रात्रीचं भाडं तब्बल 4500 रुपये

Continues below advertisement
फाईव्ह स्टार हॉटेल हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल किंवा तुमच्यापैकी अनेक जण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलेही असतील. पण दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये खास कुत्र्यांसाठी असलेलं फाईव्ह स्टार हॉटेल आहे. सहा मजली असलेल्या या हॉटेलात कुत्र्यांचा मसाज, त्यांचे खेळ, शॉपिंग आणि त्यांच्या खाण्याच्या पदार्थांची खास सोय आहे. क्रिटेरटी असं या हॉटेलचं नाव आहे. एका रात्रीसाठी १५०० रुपयांपासून साडेचार हजार रुपयं इतकं भाडं या हॉटेलात आकारण्यात येतं. कुत्र्यांसाठी खास डॉक्टर, ऑपरेशन थिएटर आणि मेडिकल स्टाफ सदैव तैनात असतो. स्विमिंग पूल, टीव्ही आणि बाल्कनीचीही सुविधा कुत्र्यांसाठी करण्यात आलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram