यवतमाळ/नांदेड : मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा फटका, शेतीचं मोठं नुकसान

मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे चिंतेचे ढग हटलेले नाहीत. आजही या भागात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली...त्यामुळे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाचा ठरणार आहे. काल विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही गावात गारपीटचा कहर बघायला. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात गारपीट मुळे गहू, संत्रा आणि भाजीपाल्याचे मोठं नुकसान झालंय.
मराठवाड्यातील नांदेडमध्येही गारपीट झाली. गारपिटीची ही दृश्यं बघून नेमकं आभाळ कसं फाटलंय याची दाहकता दिसून येत आहे.
यामुळे हरभरा, ज्वारी,गहू, द्राक्षांसह अनेक उभी पिकं भुईसपाट झाली...यानंतर सरकारनं नुकसानाच्या पंचनाम्याचे आदेश दिलेत...मात्र तोंडचा घास हिरावल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यासमोर समस्यांचा डोंगर आवासून उभा राहिलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola