अहमदाबाद : सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींच्या रोड शोला परवानगी नाही

Continues below advertisement
गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवलीय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला अहमदाबाद पोलिसांनी परवानगी नाकारलीय. सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्था, तसंच ट्रॅफिकचं कारण देत रोड शो ला परवानगी नाकारल्याचं सांगण्यात आलं. मात्र, विधानसभा निवडणूक सुरु असताना दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला परवानगी नाकारल्याची माहिती समोर येतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram