गुजरात : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त वडनगर शहराला उत्सवनगरिचं रुप
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आणि आज ते त्यांच्या मूळगावी म्हणजे वडनगरला जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून मोदी पहिल्यांदाच वडनगरला जाणार आहेत. त्यामुळे वडनगर शहराला एका उत्सवनगरीचं रूप आलं आहे. शहरात ठिकठिकाणी मोदींच्या आठवणी जागवणाऱ्या खास प्रकाशयोजनेसह सजावटी करण्यात आल्या आहेत. ज्याला पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
Continues below advertisement