गुजरातचा रणसंग्राम : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची खास मुलाखत
हार्दिक पटेल.. गुजरातच्या राजकारणात गेल्या काही वर्षात सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं नाव.. गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरुन पाटीदार समाजानं आंदोलनाला सुरुवात केली. त्याचं आंदोलनाचं नेतृत्व सध्या हार्दिक पटेलकडे आहे. गुजरातमध्ये भाजप विरोधात मोर्चेबांधणी करताना काँग्रेसनं ओबीसी नेते अल्पेश ठाकुर यांना आपल्या गोटात सामील केलं. मात्र हार्दिक पटेलनं आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. निवडणुकीच्या रणसंग्रामात हार्दिक पटेलची काय भूमिका असणार आहे, हेच जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अभिजित करंडे यांनी.