गुजरातचा रणसंग्राम : ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांची विशेष मुलाखत
पंतप्रधान नरेंद्र मोदींना होम ग्राऊंडवर मात देण्यासाठी काँग्रेसनं चांगलीच तयारी केली आहे. या लढाईत ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांना आपल्या बाजुन घेण्यात काँग्रेसला यश आलं. आधी पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्या काँग्रेस पाठिंब्याच्या चर्चा सुरु होत्या. त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये दारुबंदीच्या आंदोलनापासून ते बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांसाठी अल्पेश ठाकोर यांनी सरकारविरोधात मोठा लढा उभा केला. आता अल्पेश ठाकोर भाजपविरोधात प्रचार करत आहेत. सध्या ओबीसी समाजाचा नेमका मूड काय ओबीसी समाजाच्या नेमक्या मागण्या तरी काय आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अभिजित करंडे यांनी...