गुजरात : सुरतमध्ये रामदास आठवलेंच्या अंगावर काळा झेंडा टाकण्याचा तरुणाचा प्रयत्न
Continues below advertisement
गुजरातच्या सुरतमध्ये केंद्रीय सामाजिक न्य़ाय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अंगावर काळा झेंडा टाकल्याची घटना घडलीय. दलितांवर अत्याचार होत असताना नेते राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप करत एका तरुणानं हे कृत्य केलंय. रामदास आठवलेंच्या मागे उभ्या असलेल्या तरुणानं अचानक काळा झेंडा टाकल्याने पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला.
Continues below advertisement