गुजरात : विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थंडावणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थंडावणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती रिव्हरफ्रंटवरुन सी प्लेन ने धारोई डॅमला जाणार आहेत. तिथं ते अंबाजी मंदिरात दर्शत घेतील. तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत. दुसऱ्य़ा टप्प्यात एकूण 93 जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला 89 जागांसाठी सरासरी 65 टक्के मतदान झालं. दोन्ही टप्प्यातील एकूण 182 जागांचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे.