गुजरात : गीर अभयारण्यात सिंहांचा बेकायदेशीर शो, सात जणांना बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2018 12:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुजरातमधील गिरच्या जंगलात गुजरातचा अभिमान समजल्या जाणाऱ्या आशियाई सिंहाचा सर्रास बेकायदेशीरपणे शो केला जात असून स्थानिकांकडून छळ केला जात असल्याचं दिसत आहे. गेल्या महिन्यात गिर-सोमनाथ जिल्ह्यातून अशाप्रकारची बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान त्यांच्याकडे हा व्हिडीओ सापडला आहे. या व्हिडीओतून स्थानिक कशाप्रकारे पैज लावून सिंहाचा छळ करतात हे उघड झालं आहे.