गुजरातचा रणसंग्राम : सुरतमधील हिरे व्यापाऱ्यांचा मूड काय?
Continues below advertisement
सुरत गुजरातचं ह्रदय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या निवडणुकीत सूरत राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. अनेक उद्योगकांचं महेरघर असलेल्या सुरतला डायमंडसिटी म्हणूनही ओळखलं जातं. हिरा.. म्हटलं की डोळे लकाकल्याशिवाय राहात नाहीत. जगभरात चीन, व्हिएतनामसह बरेच देश हिरे घडवण्याच्या व्यवसायात आहेत. पण भारत सगळ्यात अव्वल. अन् जगभरातल्या 14 मौल्यवान हिऱ्यांपैकी 11 हिऱ्यांची घडणावळ सूरतमध्ये होते. या बाजारात अगदी रस्त्यावर, फूटपाथवर बसून 10 हजार लोक करोडोचा व्यवसाय करतात.पण नोटाबंदी आणि जीएसटीच्या गुंतागुंतीनं व्यापारी हवालदिल आहेत. काय मूड आहे इथल्या व्यापाऱ्यांचा जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अभिजित करंडे
Continues below advertisement