Mud Bull Racing | गुहागरमध्ये प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याप्रकरणी आमदार पुत्रासह 25 जणांविरुद्ध गुन्हा | ABP Majha

Continues below advertisement

रत्नागिरीच्या गुहागर येथे नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली घेतलेल्या बैलजोडीची स्पर्धा आता आयोजकांच्या अंगलट आली आहे. मुक्या प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी आयोजकांसह 25 जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव य़ाचाही समावेश आहे.

तर अशा स्पर्धा च्या मागे आपण ठाम उभे राहणार आणि स्पर्धांना संरक्षण नेणार असल्याचे गुहागरचे आमदार आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तर शेतकरी नांगरणी स्पर्धा घडवीत असतात उगाच प्राणी मित्रांनी काही बोलू नये, प्राणी मित्रांनी दोन बैल पळवून पाहावेत असा टोला जाधव यांनी स्पर्धेच्या वेळी लगावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram