डेबिट कार्ड, भीम अॅप आणि यूपीआयच्या खरेदीवर आता सबसिडी
डेबिट कार्डने दोन हजार रुपयांपर्यंतची खरेदी करणं आता सोपं होणार आहे. कारण केंद्र सरकारने केवळ डेबिट कार्डच नाही, तर भीम आणि यूपीआय आधारित व्यवहारांवर दोन हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे एमडीआरसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.