VIDEO | राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं राहुल गांधीना काश्मींर भेटीचं निमंत्रण | ABP Majha
जम्मू काश्मीरात हिंसाचार सुरू असल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर राज्यपाल सत्यपाल मलिक चांगलेच भडकले आहेत. मी राहुल गांधींसाठी विमान पाठवतो त्यांनी यावं इथली परिस्थिती पाहावी आणि मग बोलावं असं मलिक यांनी राहुल गांधींना सुनावलंय. जम्मू काश्मीरात चुकीचं वार्तांकन करणाऱ्या माध्यमांनाही ताकीद देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलंय.