Satbara Utara | आता जमिनीच्या न्यायालयीन खटल्यांची माहिती सातबारा उताऱ्यावर | ABP Majha
जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी सरकार लवकरच सातबाराचं नवं अद्ययावत रुप आणणार आहे. सरकार अद्ययावत लँड टायटल सर्टिफिकेट देणार आहे.
जमिनीवरुन असलेले सर्व वाद-विवाद, खटले-तंटे, सुनावणी, जप्ती प्रकरणांची एकाच दस्तऐवजावर नोंद होणार आहे. यासाठी विधीमंडळात लवकरच जमीन मालकी हक्क अधिनियम विधेयक मांडलं जाणार आहे.