शासकीय मदतीचा चेक 3 वेळा बाऊन्स, बँकेचा लाभार्थ्यालाच दंड
Continues below advertisement
सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून अपघातग्रस्तांना केलेल्या शासकीय मदतीचा चेक तीन वेळा बाऊन्स झाल्याने लाभार्थ्यालाच बँकेने दंड ठोठावला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ही घटना आहे. यवतमाळमध्ये 14 डिसेंबर रोजी कार्यक्रम घेऊन ही शासकीय मदत वितरित करण्यात आली. लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले होते. मात्र धनादेश घेऊन गेल्यावर संबंधित खात्यात पुरेसे पैसेच नाही, या कारणाने शासकीय मदतीचा धनादेश बाऊन्स झाला.
Continues below advertisement