VIDEO | बेस्ट संप सोडवण्यात सरकार, उद्धव ठाकरे अपयशी- जयंत पाटील | सांगली | एबीपी माझा
युतीचं सरकार बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्यात सपशेल अपय़शी ठरले आहेत , अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय. मुंबईकरांचे हाल पाहून तरी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं यासंबंधी वेळीच मार्ग काढायला हवा होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी भाजपकडे पानिपतसारख्या शिंदे आणि होळकर यांच्यासारख्या कुमकी नसल्यानं भाजपचा महाराष्ट्रात पानिपत होणार, त्यामुळेच भाजपाध्यक्ष अमित शाहांना पानिपतच्या युद्धाची आठवण झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला, सांगलीतल्या शिराळा इथे पाटील बोलत होते.